शहांनी घेतली सरसंघचालकांची भेट

नागपूर – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात जाऊन भेट घेतली. केवळ याच चर्चेसाठी शहा आज नागपुरात आले होते. सकाळी 12 वाजून 20 मिनिटांनी ते संघ मुख्यालयात गेले आणि तेथील चर्चा आटोपून ते 4 वाजून 40 मिनिटांनी बाहेर आले. संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

तत्पूर्वी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही सकाळी संघ मुख्यालयाला भेट दिली आणि त्या तेथून दुपारी एकच्या सुमाराला बाहेर पडल्या. आज संघ मुख्यालयात भेटीगाठींची मोठीच लगबग सुरू होती. आजच विश्‍व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित प्रमुख विष्णू सदाशिव कोकजे यांनीही संघ मुख्यालयाला भेट देऊन संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यातील कोणत्याही चर्चेचा तपशील जाहीर झालेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)