शहांनी केंद्र सरकारविषयी अधिक चिंता करावी – तृणमूलचा पलटवार

कोलकता – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्र सरकारविषयी अधिक चिंता करावी. पश्‍चिम बंगालकडे पाहण्याऐवजी त्यांनी लवकरच विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या राज्यांमध्ये लक्ष घालावे, असा पलटवार तृणमूल कॉंग्रेसकडून करण्यात आला.

शहा यांनी पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील त्या राज्यातील तृणमूल कॉंग्रेस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तृणमूल सरकार उलथवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत भाजप पश्‍चिम बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकेल, असा दावाही केला. शहा यांनी केलेल्या टीकेला तृणमूलचे नेते पार्था चटर्जी यांनी प्रत्युत्तर दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचे गुजरात आणि इतर राज्यांनी दाखवून दिल्याचे त्यांनी विविध निवडणुकांचा संदर्भ देत म्हटले. विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण केंद्र सरकार अवलंबत आहे. ते सरकार जनताविरोधी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेच्या अधिक जागा मिळवण्याचे दिवास्वप्न भाजप आणि शहांनी पाहू नये. पुढील लोकसभा निवडणुकीत देशाची जनता भाजपचा पराभव करेल, असे चटर्जी यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)