शहांच्या सुरक्षा व्यवस्थेवरील खर्चाची माहिती देण्यास नकार

नवी दिल्ली: भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षेवर होंण्याऱ्या खर्चाची माहिती देण्यास सरकारने नकार दिला आहे. या नकाराच्या विरोधात याचिकाकर्त्यांनी माहिती आयोगाकडे धाव घेतली होती पण तेथेही त्यांची डाळ शिजू शकली नाहीं कारण माहिती आयोगानेही त्यांच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाची माहिती देण्यास नकार दिला आहे. व्यक्तीगत माहिती आणि सुरक्षा या कारणास्तव अशी माहिती देण्याचे आदेश देता येणार नाही असे माहिती आयोगाने म्हटले आहे.

अमित शहा यांना केंद्र सरकारने जुलै 2014 पासून झेड प्लस सुरक्षा प्रदान केली असून तेव्हा ते कोणत्याही शासकीय पदावर नव्हते किंवा ते राज्यसभेचेही सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेवर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या संबंधात दीपक जुनेजा यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली होंती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)