शहर विकासासाठी योगदान देणार- दीप्ती गांधी 

नगर – शेवटच्या घटकांतील महिलांचे दुःख, व्यथा जाणून घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक कुटुंबाला सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे महिलांचे राजकारणातील स्थान उंचावू लागले आहे. महिला सक्षमीकरणाचा आदर्श समोर ठेवून प्रभागासह शहराच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्याची ग्वाही प्रभाग 12 ब च्या भाजपच्या उमेदवार दीप्ती गांधी यांनी दिली.

प्रभाग 12 मध्ये झालेल्या चौक सभेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, मला राजकीय वारसा असला तरी स्वतंत्र उमेदवार म्हणून जनसेवा करणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नगर शहरात अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणारे स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य, वीज, स्वच्छता आदी पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे.

-Ads-

गेल्या 15 वर्षात महापालिकेत दोन वेळा महिलांनी महापौरपद भूषविले. परंतू शहरात महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करता आली नाही.शहरातील अनेक भागात वेळी अवेळी येणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रात्र जागावे लागते. महिलांसाठी प्रभागनिहाय स्वतंत्र स्वच्छतागृह, युवती व गृहिणींसाठी अद्ययावत वाचनालय, निसर्ग सानिध्यातील जॉगिंग ट्रॅक यासारख्या अत्याधुनिक सुविधांची निर्मिती करणार आहे असे त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)