शहर विकासाचा गाडा रुतला खड्ड्यात 

नगर: अनेक वर्षांपासून नगरसेवक पद भूषविणारे व त्याच त्याच भागातून निवडुन येणारे हे नगरसेवक असतांना प्रभागांतील साधे रस्ते देखील तयार झालेले नाहीत. आता त्याच खड्डे, चिखलमय रस्त्यांवर इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी फरफट करावी लागत आहे. खड्डे, डबक्‍यांतून मार्ग काढत प्रचार करत असलेल्या उमेदवारांना यामुळे मतदारांकडून मात्र चांगलेच टोमणे खावे लागत आहेत. ‘यंदा निवडून आल्यावर प्रभागाचा विकास करू’ हे पारंपरिक आश्‍वासन देत उमेदवार प्रभागात फिरत आहेत.

साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या नगर शहरात गेल्या पाच ते दहा वर्षांत उपनगरांचा मोठा विस्तार झाला आहे. या उपनगरांमध्ये रस्त्यांचा पत्ताच नाही. यात ढवण वस्ती परिसर, विनायकनगर, शिवाजीनगर, केडगाव, बोल्हगाव, सावेडी गावठाण, सारसनगर यासह शहरातील झोपडपट्टीच्या भागात ही समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.
आज उपनगरासह शहरातील मध्यवती भागात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नाही. वर्षानुवर्ष रस्त्यांची कामे करण्यात येतात. दरवर्षी या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण रस्त्याची अवस्था काही बदलत नाही. निवडणुकीत मोठ-मोठी आश्‍वासने दिली जातात. शहरातील रक्‍तवाहिन्या काही दुरुस्त होत नाही.

मूलभूत सुविधा निधीतून अनेक रस्ते करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो. पण रस्ते कोठे केले. हे मात्र कोणीच सांगत नाही. रस्त्याची हातभर यादी आहे. पण ते-ते रस्ते दाखविण्यात आले आहे. बहुतांशी नगरसेवक ठेकेदार असल्याने रस्त्याची अवस्था त्यापेक्षा वेळी काय होणार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)