शहर फेरीवाला समितीची आता “उपसमिती’

धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय


तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रशासनाचा उपाय

पुणे – शहरातील पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी नेमण्यात आलेल्या शहर फेरीवाला समितीच्या कामकाजासाठी आता पाच सदस्यांची “उपसमिती’ नेमली जाणार आहे. या समितीची बैठक तीन महिन्यांतून एकदा होते. त्यामुळे मधल्या कालावधीत काही तातडीचे निर्णय घ्यायचे असल्यास, त्यासाठी वाट पाहावी लागते. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून शहरात शहर फेरीवाला धोरण 2013 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली असून त्यात पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, फेरीवाला संस्थाचे प्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी, यांची सुमारे 30 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून फेरीवाल्यांची नोंदणी, त्यांचे पुनर्वसन, पथारी शुल्क, फूड झोन, तसेच त्यांच्यावर कारवाईचे शुल्क तसेच अन्य तत्सम निर्णय घेतले जातात. या समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यांनी होते. त्यामुळे अनेकदा फेरीवाले तसेच पथारी व्यावसायिकांसंदर्भात काही निर्णय घ्यायचे झाल्यास प्रशासनास तीन महिने वाट पाहावी लागते. त्यात प्रामुख्याने पुनर्वसनाच्या जागांचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन शहर फेरीवाला समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाच सदस्यांची उपसमिती नेमण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती तातडीचे निर्णय घेऊन त्यानंतर हे निर्णय मुख्य फेरीवाला समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवले जाणार आहेत. या समितीचे प्रमुख म्हणून वाहतूक पोलीस उपायुक्त, महापालिकेचे प्रतिनिधी तसेच फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी असणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गरज असेल, तेव्हा घेणार बैठक
या उपसमितीच्या बैठकांसाठी कोणतीही कालमर्यादा असणार नाही. जेव्हा गरज असेलख तेव्हा ही बैठक तातडीने बोलाविली जाणार आहे. तसेच ही समिती केवळ तात्पुरत्या विषयांसाठीच निर्णय घेणार असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली, तरी मुख्य फेरीवाला समिती जो निर्णय घेईल तोच निर्णय मान्य असणार आहे. त्यामुळे ही समिती मुख्य समितीची समन्वयक समिती म्हणून काम पाहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)