शहर परिवर्तन’ची व्याप्ती रूंदावली

पिंपरी- शहर परिवर्तन कार्यालयाच्या वतीने शहरात केल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. 100 कोटी रकमेपर्यंतची कामे करण्याची अट शिथील करण्यात आली आहे. अगदी एक कोटी रकमेची कामे देखील करण्याची सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे जगभरात एक वेगळे स्थान तयार करणे, नागरिकांची जीवनशैली उंचाविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर परिवर्तनाचे उद्दिष्ट साधण्याकरिता स्थापन केलेल्या शहर परिवर्तन समितीने आपला पहिला अहवाल तयार केला आहे. हा अहवाल थेटपणे 31 ऑक्‍टोबरला झालेल्या महासभेत मांडण्यात आला. शहराचा दर्जा उंचाविण्यासाठी तसेच शहर परिवर्तनाचे उद्दीष्ट साधण्याकरिता 2 जानेवारी 2018 पासून शहर परिवर्तन कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. शहराची तुलना भारतीय आणि निवडक जागतिक शहरांशी करण्यात येते. त्यासाठी शहराचा सर्वांगीण विकास व दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी शहर परिवर्तन समितीने पहिल्या टप्प्यात शहर विकास धोरण अराखडा तयार केला आहे.

-Ads-

शहरातील 14 हजारांहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातील सुचनांनुसार एक सर्व समावेशक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये नागरिकांच्या सुचनांचा अंतर्भाव, प्रतिक्रिया तसेच महापालिकेच्या संबंधित विभागाशी चर्चा करून महापालिकेचे ध्येय, मूल्ये व धोरण आराखडा तयार केला आहे. यामध्ये 22 धोरणात्मक उपक्रमांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहर परिवर्तन कृतीची आवश्‍यकता, शहराचे ध्येय, उद्दिष्ट मूल्यांकन मूल्य, धोरण आराखडा, परिवर्तनाची रूपरेषा असे मुद्दे ठेवले आहेत. राहण्यायोग्य शहर बनविणे असे उद्दिष्ट आहे. 2030 पर्यंतचे नियोजन केले आहे. शहराचा सर्वांगीण विकास करणे, नागरिकांना शहर ओळख निर्माण करण्यात समाविष्ट करणे, चिरस्थायी पर्यावरणपूरक शहर आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत:च्या अधिकारात ही सर्व कामे पार पडली आहेत.
दरम्यान, या कार्यालयाच्या वतीने केल्या जाणाऱ्या विकास कामांना महापालिका निधी पुरविणार आहे सुरूवातीला केवळ 100 ते 500 कोटी रकमेची कामे पूर्ण करण्याचे या कार्यालयाचे उद्दीष्ट होते. मात्र,या उद्दीष्टामध्ये फेरबदल करत, आता एक कोटी रकमेची कामेदेखील हे कार्यालय सुचवू शकणार आहे.

नुकत्याच झालेल्या शहर परिवर्तनच्या बैठकीत आयुक्त श्राव हर्डीकर यांनी विकासकामांच्या बाबतीत बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार एक कोटी रुपयापर्यंतची कामे देखील सुचविली जाणार आहेत. तसेच विविध विकास कामाचा देखील नव्याने समावेश करण्यात आला आहे.
– नीळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)