“शहर परिवर्तन’चा अहवाल महासभेसमोर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर परिवर्तन समितीने त्यांचा पहिला अहवाल तयार केला असून महापालिकेच्या शनिवारी (दि. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाणार आहे.

शहर परिवर्तनाचे उद्दीष्ट साधण्याकरिता 2 जानेवारी 2018 पासून शहर परिवर्तन कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. शहराचा विकास व दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी शहर परिवर्तन समितीने पहिल्या टप्प्यात शहर विकास धोरण अराखडा तयार केला आहे. यासाठी विभागाने शहरातील 14 हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

-Ads-

या सर्वेक्षणातील सुचनांनुसार एक सर्व समावेशक अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये नागरिकांच्या सुचना, प्रतिक्रिया तसेच महापालिकेच्या संबंधित विभागाशी चर्चा करून महापालिकेचे ध्येय, मुल्ये व धोरण आराखडा तयार केला आहे. यामध्ये 22 धोरणात्मक उपक्रमांचा देखील समावेश आहे. हा अहवाल शनिवारी महापालिकेच्या सभेसमोर सादर होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा “स्मार्ट सिटी’मध्ये समावेश झाला आहे. तसेच शहर राहण्यायोग्य शहराच्या यादीमध्येही समाविष्ट आहे. मात्र हा दर्जा अधिक सुधारावा यासाठी या विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)