शहर टाकळी येथे “रास्ता रोको’

शिवाजी महाराजांविषयी समाजमाध्यमांत आक्षेपार्ह मजकूर

भावीनिमगाव – शेवगाव तालुक्‍यातील शहर टाकळी येथे एका व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या घटनेचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या युवकांनी शहर टाकळी-दहिगाव (ने) रस्त्यावर दोन तास “रास्ता रोको’ आंदोलन केले.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून गावात तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. गावातील मुख्य चौकात ‘रास्ता रोको’ झाला. त्यानंतर तिथे निषेध सभा घेऊन आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. या वेळी गावातील मुख्य चौकात संतप्त जमावाकडून टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. गावातील सर्व व्यापारी व छोट्या मोठ्या दुकानदारांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. घटनास्थळी शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त जमावाकडून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.शेवगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, “सोशल मीडिया’च्या वापराबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच्या वापरावर निर्बंध येण्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)