शहर घेणार मोकळा श्‍वास

100 ठिकाणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी संयुक्त मोहीम

पुणे : वाहतूक कोंडीने पुणे शहराचा कोंडलेला श्‍वास आता मोकळा होणार आहे. अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होणाऱ्या प्रमुख 100 ठिकाणी महापालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई येत्या शुक्रवारपासून एकाच वेळी करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा संयुक्त पथके केली जाणार असून या कारवाईसाठी 25 क्रेन वापरल्या जाणार आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

-Ads-

पुढील दहा दिवस ही कारवाई केली जाणार असून ठिकाणे वाहतूक पोलिसांनी निश्‍चित केली आहेत. त्यात प्रामुख्याने मध्यवर्ती रस्ते, पेठामधील चौक आणि वारंवार कोंडी होणाऱ्या चौकाचा समावेश आहे. या ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे कोंडी होऊन सकाळी आणि सायंकाळी त्याचा परिणाम या कोंडीच्या ठिकाणांवर जोडणाऱ्या रस्त्यांवर होतो. परिणामी शहरातील वाहतुकीचा वेग मंदावून जवळपास 40 ते 50 टक्के शहरात एकाच वेळी वाहतूक कोंडी होऊन त्याचा ताण सर्वच यंत्रणांवर येतो, ही बाब लक्षात घेऊन ही संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

एकाचवेळी संयुक्त कारवाई
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून पाहिल्यादाच संयुक्त कारवाई केली जाणार आहे. यात ज्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमणे, पथारी, स्टॉल, तसेच इतर अतिक्रमणे आहेत ते महापालिका काढणार आहेत. तर, या ठिकाणी असलेल्या पार्किंगवर तसेच रस्ते आडवीत थांबलेली वाहने थेट जप्त केली जाणार आहेत. तसेच वाहनचालकांची कागदपत्रेही जमा करून घेतली जाणार आहेत. या वाहन तसेच अतिक्रमणांमुळे या 100 ठिकाणी मोठी कोंडी होता असून त्याचा फटका वाहतुकीला बसत असल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन ही कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

पुन्हा रस्ते अडविल्यास फौजदारी कारवाई
ही कारवाई केवळ एका दिवसांपुरती न करता ती या पुढे कायम सुरू ठेवली जाणार आहेत. यात संबंधित अतिक्रमण केलेला नागरिक अथवा अनधिकृतपणे पार्किंग केलेले वाहन पुन्हा आढळल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. त्यासाठी 100 ठिकाणे ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतात त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढील दोन दिवसांत ही संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. महापालिका केवळ अतिक्रमणे काढते तर पोलीस वाहतूक सुरळीत करतात. या दोन्ही यंत्रणा आपल्या सोयीनुसार, कारवाई करतात त्यामुळे समस्या आहे तिथेच राहाते. ही बाब लक्षात घेऊन सयुंक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

– सौरभ राव, महापालिका आयुक्त

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)