शहर अभियंत्यांना “दणका’

पिंपरी- शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्या कार्यशैलीबद्दल दस्तुरखुद्द महापौर राहूल जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत, या प्रकरणाचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश आयुक्‍त हर्डीकर यांना प्रशासन विभागाला दिले आहेत. दोन दिवसांत महापौर जाधव यांच्या आरोपांमधील तथ्य समोर येणार आहे.

राहुल जाधव हे महापौर झाल्यानंतर त्यांनी शहरातील आरक्षित जागांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच, आरक्षित जागांना संरक्षक भिंत घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. याबाबत 24 ऑगस्टला महापौर दालनात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. महापालिकेच्या आरक्षित जागांना संरक्षण भिंत अथवा तारेचे कुंपण घालण्याच्या सूचना शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना दिल्या होत्या. एका महिन्यानंतरही महापौरांच्या सूचनांना चव्हाण यांनी केराची टोपली दाखविली.

-Ads-

चव्हाण यांच्यावर कामाचा ताण असल्याने महापौर जाधव यांनी त्यांना याच कामाकरिता एका महिन्याची मुदतवाढ दिली. मात्र, या कामाच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता, अद्यापही कार्यवाही शून्य असल्याचे समजल्यानंतर महापौरांचा पारा चढला. त्यांनी अंबादास चव्हाण यांनी शहराच्या प्रथम नागरिकाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही, ही गंभीर बाब आहे. याची खातरजमा करून, चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करुन, त्यांच्यावर करवाई करण्याची मागणी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली होती.

दरम्यानच्या काळात दिवाळीच्या जोडून आलेल्या सुट्टया व महापौर जाधव, आयुक्त हर्डीकर, अन्य पदाधिकारी व अधिकारी परदेश दौऱ्यावर गेल्याने सुमारे पंधरा दिवस महापालिकेतील कामकाज थंडावले होते. आता हे सर्व पदाधिकारी व अधिकारी पुन्हा शहरात परतले असून, महापालिकेतील कामकाजात सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता आयुक्त हर्डीकर यांनी महापौर जाधव यांच्या मागणीची दखल घेत, प्रशासनाला आदेश दिले आहेत.

ज्योत्स्ना शिंदेंवरील कारवाई कायम…
काही महिन्यांपूर्वी महापालिका शिक्षण समितीमध्ये प्रशासन अधिकारीपदी नियुक्त झालेल्या ज्योत्स्ना शिंदे यांनी 5 सप्टेंबरला साजरा केल्या जाणाऱ्या शिक्षक दिनाचे नियोजन न केल्याने, विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टिकेची झोड उठविली होती. त्यामुळे भाजपची मोठी मानहानी झाली होती. शिंदे यांच्या कामकाजाबाबत नाराज असलेले महापौर राहुल जाधव यांनी शिंदे यांना पुन्हा शासकीय सेवेत पाठविण्याची उपसूचना महासभेत मंजुरही केली असून, त्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच हा बदल होणार असल्याचे सूतोवाच महापौर जाधव यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)