शहरी आणि ग्रामीण ग्राहकांत फरक नाही – आनंद महिंद्रा 

नवी दिल्ली – आतापर्यंत केली जात असलेला शहरी आणि ग्रामीण ग्राहक ही वर्गवारी कृत्रिम आहे. याकडे दूर्लक्ष करून आता महिंद्रा समूह शहरी आणि ग्रामीण भागासाठी एकाच प्रकारची उत्पादने विकसित करणार असल्याचे महिंदा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यानी सांगितले. तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणामुळे एकाच प्रकारची माहिती शहरात आणि ग्रामीण भागात जाते. त्यामुळे विविध उत्पादनाच्या बाबतीत शहरातील आणि ग्रामीण भागातील ग्राहकांच्या एकच अपेक्षा असल्याचे आम्हाला वाटते. आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकाच्या बाबतीत भेद करण्याची प्रथा रूढ झाली होती. मात्र आता आम्ही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे.

आम्ही आता सर्व भारतासाठी एकाच प्रकारची एकाच दर्जाची उत्पादने तयार करीत आहोत. ग्रामीण भागातील जनतेला कमी लेखणे बरोबर नाही. त्याची खरेदी क्षमता आणि अपेक्षा सारख्यच असतात. महिंद्रा उद्योग समूहाच्या सर्व उत्पादनांना शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही सारखाच प्रतिसाद मिळतो. यावरून आपले हे मत तयार झाले असल्याचे महिंद्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)