शहराध्यक्षपदाची घोषणा झालीच नाही

पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाबरोबरच पुण्याच्या शहराध्यक्षपदाची घोषणाही रविवारीच प्रदेश कार्यकारिणीवेळी जाहीर होईल, अशी शक्‍यता फोल ठरली आहे. त्यामुळे शहराध्यक्ष निवड आणखी 15 दिवस पुढे जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

रविवारी पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची कार्यकारिणी झाली. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्याशिवाय अन्य काही पदांचीही घोषणा झाली. मात्र पुण्याच्या शहराध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली नाही. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून आता नवे प्रदेशाध्यक्ष त्यांची रणनिती आखतील. त्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच शहराध्यक्ष निवडतील. त्यामुळे शहराध्यक्षपदाची निवड आणखी 15 दिवस पुढे जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

ऍड. वंदना चव्हाण यांना दुसऱ्यांदा राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. त्यामुळे त्याचवेळी नेते अजित पवार यांनी शहराध्यक्ष बदलाबाबत सुतोवाच केले होते. त्यानुसार अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. प्रदेशाध्यक्षपदाच्या धामधुमीत हा देखील निर्णय होईल, असा अंदाज अनेकांनी लावला होता. मात्र, तो खरा ठरला नाही. आता जयंत पाटीलच त्यांचा नवा शिलेदार निवडतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)