शहरात 325 अनधिकृत होर्डींग्ज

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 1850 अधिकृत होर्डींग्ज असून, आतापर्यंत 325 अनधिकृत होर्डींग्जची आकाशचिन्ह व परवाना विभागात नोंद झाली आहे. या सर्व होर्डींग्ज धारकांना नोटीस बजावण्यात आली असून, आतापर्यंत 22 जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील होर्डींग्ज काढताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने होर्डींग्जचा सांगाडा कोसळल्याने चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रत्येक चौकात अवाढव्य फ्लेक्‍स व होर्डींग्ज उभारले आहेत. यामध्ये काही अनधिकृत होर्डींग्जचा देखील समावेश आहे. शहरात 1 जूनला वादळ, वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे होर्डींग्ज पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. सायंकाळी वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या जोरदार वारा व पावसामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी अधिकृत अनाधिकृत फ्लेक्‍स पडून वित्त व जिवितहानी झालेली आहे. पुण्यातील घटनेनंतर महापौर राहुल जाधव यांनी शहरातील सर्व होर्डींग्जचे धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी देखील शहरातील अनधिकृत होर्डींग्ज व फ्लेक्‍स काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

-Ads-

वास्तविक पाहता, शहरातील अनधिकृत होर्डींग्जच्या संख्येला आळा घालण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाने धोरण ठरविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र, 1 जूनला शहरातील दोन नागरिकांचा बळी घेऊनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. त्यामुळे पुण्याची घटना आता प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे.

दोषींवर कारवाई कधी?
1 जूनला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मोशी येथील नंदू शहा आणि पुनावळे येथील कांताबाई भारती या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला. याला महापालिकेचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याने दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाची चौकशीच न झाल्याने आकाशचिन्ह व परवाना विभागातील अधिकाऱ्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. महापालिका प्रशासनाने हे प्रकरण दडपल्याची महापालिकेत दबक्‍या आवाजात चर्चा होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)