शहरात हल्ल्याच्या दोन घटना

पिंपरी – पुर्ववैमनस्यातून शहराच्या दोन घटनांमध्ये दोन तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. चिंचवड व पिंपळे निलखमध्ये या घटना घडल्या.

पहिली घटना बुधवारी (दि. 14) रात्री आठ वाजता चिंचवड येथील केएसबी चौकात घडली. या घटनेत गोपाळ कुंडलिक कांगणे (वय-30, रा. मोरवाडी, लालटोपीनगर, पिंपरी) आणि चार आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून 13 मार्चला भांडण झाले होते. भांडणाच्या दुसऱ्या दिवशी आरोपींनी भांडण आपापसात मिटवून घेण्याच्या बहाण्याने फिर्यादीला चिंचवड येथील केएसबी चौकात बोलावून घेतले. आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी गोपाळ कांगणे यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. जवळच सुरु असलेल्या बांधकाम साईटवर पडलेला सिमेंट ब्लॉक कांगणे यांच्या डोक्‍यात मारला. यामध्ये कांगणे गंभीर जखमी झाले. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना पिंपळे निलख येथे गुरुवारी (दि. 22) रात्री दहाच्या सुमारास घडली.आकाश चंद्रकांत लांडगे (वय 23, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी अंबादास पासलकर, बंटी टकले, आकाश दोडके आणि अन्य दोन साथीदारांविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी यांची मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आकाश लांडगे याला पिंपळे निलख येथील दत्त मंदिराजवळ बोलावून लांडगे याच्या डोक्‍यात लोखंडी कोयत्याने वार केला. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)