शहरात स्वाईन फ्लूचे तब्बल 172 रुग्ण

File Photo

सप्टेंबर महिन्याच्या 14 दिवसांत 115 रुग्णांना लागण

पुणे – स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ऑगस्ट महिनाअखेर 57 असणारी रुग्णसंख्या आता 172 वर जाऊन पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्याच्या चौदा दिवसांत 115 रुग्णांची भर पडली आहे. तर, आतापर्यंत 24 रुग्णांबाबत पालिकेने माहितीच दिली नसून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

जानेवारी ते जुलैपर्यंतच्या सात महिन्यांत अवघे 15 स्वाईन फ्लू रुग्ण आरोग्य विभागाला आढळून आले होते, मात्र आता ही संख्या दोनच महिन्यांत 172 वर जाऊन पोहोचली आहे. रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता शहरात स्वाईन फ्लूची मोठी दहशत पसरली आहे. त्यात पालिकेकडून म्हणावी तशी जनजागृती होत नसल्याचेही चित्र आहे.

दिवसागणित सात ते आठ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत असल्यामुळे रुग्णालयांवरही ताण येऊ लागला आहे. अनेक रुग्णालये आमच्याकडे जागाच नसल्याचे सांगत हात वर करत आहेत. तर, पालिकेकडून ज्या प्रमाणात रुग्णालयांना तसेच नागरिकांना सूचना देणे अपेक्षित आहे, त्या प्रमाणात दिल्या जात नाहीत. तसेच, अत्यावस्थ रुग्णांची संख्याही पालिकेडून अद्याप जाहीर झालेली नाही.

पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, 172 रुग्णांपैकी 63 रुग्णांना उपचारांती घरी सोडले आहे; तर 82 रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. त्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य 24 जणांबाबत आरोग्य विभागाकडून माहिती सांगण्यात आलेली नाही. याबाबत सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)