पुणे – मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना मंगळवारी शहरात घडल्या. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पहिली घटना बंडगार्डन पोलिसांच्या हद्दीत घडली. रास्ता पेठेत राहणाऱ्या 70 वर्षीय ज्येष्ठ महिला गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळी सकाळी पावणेसातच्या सुमारास त्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या समोरील रस्त्यावरून पायी चालल्या होत्या. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि बदाम असा 44 हजार रुपयांचा ऐवज हिसका मारून लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक एस.ए.जमदाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तर दुसरी घटना अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. कर्वे नगर येथे राहणाऱ्या 74 वर्षीय ज्येष्ठ महिला मार्निंग वॉकसाठी पायी जात होत्या. त्यावेळी त्या सकाळी पावणेसातच्या सुमारास देवकाते बिल्डींग परिसरात आल्या. तेथे दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील 28 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. दोघे फरार झाले. पोलीस उपनिरीक्षक डी.एन.निकम पुढील तपास करत आहेत.

Remarks :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)