शहरात सर्वत्र “सायकल शेअरींग’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत शहरात सर्वत्र “सायकल शेअरींग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिका व स्मार्ट सिटी प्रा. लि. च्या संचालक मंडळाची महापालिका आयुक्त कार्यालयात बैठक झाली. यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये संपूर्ण शहरात सायकल शेअरींग करणे, रुफ टॉप सोलार निर्मिती, स्मार्ट शाळा, रस्ते बांधणी अशा अनेक निर्णयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर, आयुक्‍त हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले तसेच कंपनीचे इतर पदाधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्‍त हर्डीकर यांनी याबाबत माहिती दिली.

आयुक्‍त हर्डीकर म्हणाले की, पिंपळे गुरव येथे प्रायोगिक तत्त्वावर “सायकल शेअरींग’ प्रकल्प राबवला आहे. त्यानुसार शहर परिसरात सर्वत्र हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला येत्या दोन महिन्यांत शहर परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. यामध्ये अविकसित परिसरात शेअरींग शुल्क कमी करण्याचा आमचा मानस आहे. पिंपळे गुरव येथे ताशी 10 रुपये प्रमाणे सध्या सायकल दिली जाते. मात्र सर्वच भागात हा दर न ठेवता नागरिकांच्या गरजेनुसार तो कमी करण्यात येणार असल्याचेही आयुक्‍तांनी सांगितले.

तसेच “स्मार्ट सिटी’ अंतर्गत जे रस्ते बनवले जाणार आहेत. त्या रस्त्यांच्या बाजूला स्वतंत्र सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार असल्याचेही आयुक्‍तांनी सांगितले.

मेट्रोचे काम झाल्यावर सायकल ट्रॅक
निगडी-दापोडी या बीआरटी मार्गाबाबत पत्रकारांनी विचारले असता, या मार्गावरही सायकल ट्रॅक निर्माण करणार असल्याचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले. मात्र सध्यस्थितीत मेट्रोचे काम सुरु असल्याने अडचणी येत असून मेट्रोचे काम संपताच सायकल ट्रॅकचे काम हाती घेण्यात येईल. मात्र शहरात या आधीही सायकल ट्रॅकची तरतूद असून देखील एकही सायकल ट्रॅक अस्तित्वात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावेळीही ते सत्यात उतरणारी की केवळ कागदावर राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)