शहरात शाळेच्या नुसत्याच मोठ्या इमारती -जाधव

रेडा- शहरात शाळेच्या नुसत्याच मोठ्या इमारती असतात; परंतु ज्ञानदान त्याप्रमाणात नसते; परंतु ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची दालने खुली झाली असल्याने ग्रामीण भागील मुले ही शिक्षणाची गोडी चाखत स्पर्धा परीक्षेत व खेळात बाजी मारत असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी व्यक्‍त केले. लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील विद्या निकेतन स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या 11 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या मुख्य सचिव चित्रलेखा ढोले, सल्लागार प्रदिप गुरव, मुख्याध्यापक बालाजी मोटे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. श्रीमंत ढोले म्हणाले की, पालक, शिक्षक व विद्यार्थी या तीन घटकांचा समन्वय साधून ज्ञानदान सुरू असल्याने विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये चमकत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी उपस्थितांना व वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)