शहरात “व्हिटामीन-सी’ औषधांचा तुटवडा

पिंपरी – सध्या बदलत्या वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढत असतानाच काही महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेषतः व्हिटामीन-सी च्या औषधांचा स्टॉक संपत आला असून उत्पादन देखील कमी झाले असल्याचे औषध विक्रेत्यांचे मत आहे. ही औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापैकी 60 टक्‍के कच्चा माल चीनमधून येतो. या कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्यामुळे तसेच सरकारकडून काही औषधांच्या किंमतींवर नियंत्रण घालण्यात आल्याने देखील उत्पादन कमी झाले आहे.

औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या ड्रग्सपैकी 60 टक्‍के बल्क ड्रग्स चीनमधून आयात केले जातात. सध्या चीन हा पर्यावरणाबाबत खूप कठोर पावले उचलत असल्याने बहुतेक फार्मा कंपन्यांचे प्लांट अपग्रेड होत आहेत किंवा बंद करण्यात आले आहेत. यामुळे बल्क ड्रग्सची आयात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यापैकी काही घटक भारतात उपलब्धच नाहीत. ऍक्‍टिव्ह फार्मास्युटिकल्स इंग्रीडेंटस्‌ (एपीआय) च्या आयतीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक पातळीवर होणाऱ्या औषध उत्पादनावर देखील होत आहे. यापुढे हा तुटवडा प्रकर्षाने जाणवणार असल्याचेही औषध विक्रेत्यांचे मत आहे.

-Ads-

बल्क ड्रग्सच्या कमतरतेमुळे औषध उत्पादनावर संकट आले आहेत. स्थानिक पातळीवरील केमिस्टने दिलेल्या माहितीनुसार काही आवश्‍यक औषधांचा पुरवठा जवळपास थांबला आहे. या तुटवड्यामुळे दरात देखील वाढ होत आहे. “व्हिटामीन-सी’ औषधांचा वापर बहुतेक आजारांमध्ये होतो. डोळ्यांच्या विकारापासून ते कॅन्सरपर्यंत कित्येक औषधांमध्ये व्हिटामीन-सी च्या औषधांचा वापर केला जातो.

ताप, अंगदुखीमध्ये घेतल्या जाणाऱ्या पॅरासिटामोलसारख्या औषधाच्या एपीआईच्या किंमतींमध्ये गेल्या सहा महिन्यांत दुप्पट वाढ झाली आहे. एपीआईच्या दरात वाढ झाली असली तरी सरकारने बऱ्याच औषधांचा समावेश “प्राइस कंट्रोल’ मध्ये केला असल्याने उत्पादक किंमती वाढवू शकत नाहीत. परंतु काही उत्पादकांनी उत्पादन कमी केले असल्याचे देखील औषध विक्रेते सांगत आहेत.

सरकारने दोन ते अडीच वर्षांत 851 ड्रग्स फॉर्म्युलेशनच्या किंमती नियंत्रणात आणून 5 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्या आहेत. याचा परिणाम देखील औषध उत्पादनावर झाला आहे. याच प्रकारे 328 औषधांच्या फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशनवर देखील सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. व्हिटामीन-सी आणि प्रतिबंधीत 325 फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशन स्टॉक पाईप लाईनमधून संपले आहेत. याचा परिणाम वैद्यकीय क्षेत्रात प्रामुख्याने दिसून येत आहे.

“ऑक्‍सिटोसीन’ वर नियंत्रण
याशिवाय गर्भवती महिलांमध्ये हॅमरेज (अतिरिक्‍त रक्‍तस्त्राव झाल्याने निर्माण होणारी समस्या) चा त्रास झाल्यास उपयोग सिद्ध होणाऱ्या “ऑक्‍सिटोसीन’ वर देखील सरकारने नियंत्रण आणले आहे. ऑक्‍सिटोसीनचे इंजेक्‍शन गाय, म्हैस यांना देऊन दूध उत्पादन वाढवण्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने या इंजेक्‍शनवर नियंत्रण आणले आहे. हे इंजेक्‍शन देखील बाजारात उपलब्ध नाही.

“व्हिटामीन-सी’ च्या औषधांचा मोठा तुटवडा आहे. शहरातील स्टॉक पूर्णपणे संपत आला आहे. जेनेरिककडे देखील या औषधांचा स्टॉक उपलब्ध नाही. “व्हिटामीन-सी’ च्या औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या बल्क ड्रग्सचा चीनकडून पुरवठा होत नसल्याने शॉर्टेज निर्माण झाले आहे. तसेच ऑक्‍सिटोसीनवर देखील नियंत्रण आणण्यात आले आहे. शहरी भागात या नियंत्रणाची गरज नव्हती.
-विवेक तापकीर, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)