शहरात बावीस ठिकाणी नमाज पठण

सातारा- मुस्लीम बांधवांचा ईद-उल-अज्हा (बकरी ईद) हा सण उत्साहात साजरा होणार आहे. या सणासाठी शहरातील सुमारे मशिदींमध्ये सकाळी नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील मशिदींमध्ये पुढीलप्रमाणे नमाज अदा करता येणार आहे. पोवईनाका मशीद- सकाळी आठ वाजता, एसटी स्टॅंड मशीद सकाळी साडे सात वाजता, पोलिस मुख्यालय मशीद- सकाळी साडे वाजता, शाही मशीद- सकाळी साडेआठ वाजता, मर्कज (खड्डा मशीद) सकाळी सवा आठ वाजता, पापाभाई कॉलनी मशीद- सकाळी नऊ वाजता, शनिवार पेठेतील मदिना मशीद- सकाळी आठ वाजता, बुधवार पेठेतील मक्का मशीद- सकाळी नऊ वाजता, माची पेठेतील बेगम मशीद सकाळी सव्वाआठ वाजता, मशीद अक्‍सा- सकाळी पावणेनऊ वाजता, सत्वशीलनगर सकाळी साडे आठ वाजता, कामाठीपुरा येथील चॉंदतारा सकाळी साडेआठ वाजता, एमआयडीसी येथील हिरा फ्लोअर मिल सकाळी नऊ वाजता, जुनी एमआयडीसी इब्राहिमभाई जर्दा- सकाळी नऊ वाजता, डी. बी. शेख वखार- सकाळी साडेआठ वाजता.

करंजे येथील बिलाल सकाळी साडेआठ वाजता, संगमनगर सकाळी नऊ, पिरवाडी सकाळी साडेआठ वाजता, कब्रस्तान ईदगाह सकाळी दहा वाजता, सदरबझार ईदगाह सकाळी पावणे नऊ वाजता, सदरबझार मशीद सकाळी पावणे दहा वाजता.

सर्व मुस्लीम बांधवांनी नमाज पठणासाठी वेळेवर उपस्थित राहावे. तसेच प्रत्येक मशिदीच्या परिसरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व बांधवांनी आपली वाहने पार्किंगमध्येच आणि मशिदीपासून 100 मीटर अंतरावर लावावीत व जिल्हा पोलिस दलास व प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे. तसेच पाऊस पडल्यास सर्वांनी आपापल्या मशिदीमध्येच नमाद अदा करावी, असे आवाहन मुस्लीम मायनॉरिटी कौन्सिलचे अध्यक्ष इरफान बागवान यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)