शहरात दहा ठिकाणी “झाडपडी’

पुणे – पावसामुळे शहरात झाड तसेच झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडत आहेत. मागील दोन दिवसांत सुमारे दहा ते पंधरा घटना घडल्या आहेत. यामध्ये मंगळारी लष्कर परिसरात झाड कोसळल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन कारचे नुकसान झाले. मात्र, या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. झाड पडल्याच्या घटनेमुळे लष्कर परिसरात बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पुणे कॅन्टोन्मेट बोर्ड अग्निशमन दलाच्या पथकाने लष्कर परिसरात दाखल होऊन झाडांच्या फांद्या तोडून वाहतूक पूर्ववत केली होती. केंद्रप्रमुख प्रकाश हसबे, तांडेल दिपक बंदुलवार, महेंद्र महामुनी, सिध्दीविनायक गिलबिले, प्रमोद चव्हाण, सागर देशमाने आदीच्या पथकाने करवत तसेच कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून झाड बाजुला घेतले. तसेच रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

शहरात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मंगळवारी दिवसभरात शहरात झाड पडण्याच्या दहा घटना घडल्या. तर बुधवारी तीन ते चार ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या. शिवाजीनगर, वारजे, येरवडा, आपटे रस्ता, गोल्फ क्‍लब, सेनापती बापट रोड, हनुमान नगर, सहवास सोसायटी, कर्वेनगर, रविवार पेठ, आदी भागात झाडे कोसळली आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)