नवी दिल्ली – शहरे आर्थिक विकासाला चालना देतात, त्यामुळे शहरी जनतेला पुरेशी घरे आणि अन्य आवश्‍यक सुविधा पुरवण्याची गरज आहे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. आपण गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री असताना ज्या कल्पना मांडल्या त्यांच्या पायाभरणी समारंभात सहभागी होणे ही आपल्यासाठी अभिमानाची आणि समाधानाची बाब असे ते म्हणाले. सर्व नागरीकांना घरे पुरवण्याबरोबरच उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करुन शाश्वत विकास सुनिश्‍चित करायला हवा, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)