शहरात अद्ययावत हॉस्पिटल उभारण्याचा डॉक्‍टरांचा संकल्प

नगर – युथ फोरम ऑफ होमिओपॅथी डॉक्‍टर संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. रणजित सत्रे यांची नुकतीच निवड करण्यात आली. हॉटेल पटियाला हाऊस येथे पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत सत्रे यांच्या निवडीची घोषणा करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी शहरासह उपनगरातील होमिओपॅथी डॉक्‍टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत होमिओपॅथी डॉक्‍टरांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. तसेच, सर्व होमिओपॅथी डॉक्‍टर एकत्र येऊन शहरात एक अद्ययावत हॉस्पिटल उभारणार असल्याचा ठराव घेण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. अशोक भोजणे यांनी संघटनेच्या वतीने चालू असलेल्या कार्याचा आढावा घेऊन नवीन सुरू करण्यात येणारे प्रकल्प व उपक्रमांची माहिती दिली. डॉ. गोपाळ बहरूपी यांनी “सांधेवात’ या आजाराबद्दल शास्त्रोक्‍त माहिती देऊन त्याची उपचार पध्दती स्पष्ट केली.

बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सत्रे यांनी होमिओपॅथी डॉक्‍टरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, शहरासह जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्‍टर संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच, नवीन हॉस्पिटल उभारणीसाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. निवड करण्यात आलेली युथ फोरम ऑफ होमिओपॅथी डॉक्‍टर संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष – रणजित सत्रे, उपाध्यक्ष – संजीव गडगे, सचिव – मनीष थवाणी, सहसचिव – सुबोध देशमुख, कार्यकारिणी सदस्य – अर्जुन घुले, डॉ. शशी गिते, रवींद्र सातपुते, राजेंद्र बोरडे, गणेश श्रीगादी, दीपक दरंदले, संजय पठाडे, गणेश गावडे, रोहित गुगळे, कमलेश तलरेजा, सुरेंद्र खोपे, इम्रान शेख, जलाल सय्यद, राजेंद्र शेजूळ, सुजित दिघे, किरण कर्डिले, दीपक कारखिले, रवी कानडे, नांदेश नवले, क्षितिज चौधरी, महावीर बोरा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले. आभार अनिल करांडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)