शहरातील 615 सोसायट्यांना नोटीस

– कचरा प्रक्रिया यंत्रणा न उभारल्यास चालढकल

पिंपरी – गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही, अशा स्वरुपाच्या नोटीस महापालिकेने शहरातील 615 सोसायट्यांना दिल्या आहेत.

-Ads-

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील सोसायट्यांनी त्यांच्याकडे निर्माण होणारा सुका व ओला कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार आणि सरकारच्या एप्रिल 2017 च्या निर्णयानुसार आपले घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे सर्वांना बंधनकारक आहे. दररोज शंभर किलोग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संघटित संस्था व सोसायट्यांनी ज्यांचे क्षेत्र पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आहे. त्यांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वतः ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी निश्‍चित केलेली आहे. त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभारून फक्त सुका कचरा महापालिकेकडे देण्याबाबतची माहिती देण्याची मुदत 29 सप्टेंबरपर्यंत होती.

तथापि, बहुतांश सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केली नसल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. हा प्रकार घनकचरा व्यवस्थापन नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे महापालिकेने सोसायट्यांना नोटीस दिली आहे. त्यात आपल्या गृहनिर्माण सोसायटीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा सात दिवसांत उपलब्ध करून ती कार्यान्वित करायची आहे. त्याबाबतची माहिती लेखी स्वरुपात कळवावी, असे नमूद केलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)