शहरातील 103 रिक्षांवर कारवाई

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील अवैध प्रवासी वाहतूक, स्क्रॅप झालेल्या रिक्षा व लक्‍झरी बसवर कारवाईची मागणी केल्यानंतर वाहतूक पोलीस शाखेने शहरातील 103 कारवाई करण्यात आली आहे. मात्र, इतर तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी माहिती क्रांती रिक्षा सेनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

क्रांती रिक्षा सेनेच्या वतीने शहरात सुरु असलेली अवैध प्रवासी वाहतूक, स्क्रॅप झालेल्या खासगी आणि सहा सीटर रिक्षा या तीन समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांना देण्यात आले होते. याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, 23 जानेवारीला संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर 16 फेब्रुवारीला संघटनेशी केलेल्या पत्रव्यवहारात या कालावधीत शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 103 रिक्षांवर कारवाई केल्याचे नमूद कण्यात आले आहे. मात्र, स्क्रॅपमधील रिक्षा आणि तापकीरनगर ते काळेवाडी फाटा दरम्यान बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणाऱ्या लक्‍झरी बसगाड्यांवरील कारवाईची माहिती देण्यात आलेली नाही. या दोन्ही समस्यांकडे पुन्हा संघटनेने लक्ष वेधले असून पाठपुरावा सुरु केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)