शहरातील सर्व संशयास्पद स्पा/मसाज सेंटरची तपासणी आवश्‍यक

पुणे : शहरात मागील काही वर्षांत नजरेत भरेल इतक्‍या मोठ्या प्रमाणात स्पा आणि आयुर्वेदिक मसाज सेंटरचे जाळे पसरले आहे. तेथे येणारे ग्राहक आणि मिळणारी सेवा ही नेहमीच संशयास्पद असल्याचे दिसते. सामाजिक सुरक्षा विभागाकडून अनेकदा या प्रकारच्या स्पा व मसाज सेंटरवर छापे टाकून वेश्‍याव्यवसायाचा पदार्फाश करण्यात आला आहे.

मात्र, तरीही जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दर महिन्याला एकतरी नवे मसाज सेंटरचे उद्‌घाटन होताना दिसते. मॉलमध्ये असलेल्या मसाज सेंटरमध्येही वेश्‍याव्यवसाय चालत असलेला काही कारवायांवरून उघड झाले आहे; तर दोन महिन्यांपूर्वीच महर्षिनगर येथे एका आंतरराष्ट्रीय स्पा सेंटरमध्ये वेश्‍याव्यवसाय होत असल्याचे उघड झाले होते. यामुळे पोलीस ठाण्याच्या पातळीवरच स्पा/मसाज सेंटरची झाडाझडती होणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)