शहरातील शाळांना कृतीशील पुरस्कार

निगडी – पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालय व सौ. अनुसया वाढोकार उच्च माध्य. विद्यालय व यमुनानगर निगडी येथील शिवभूमी विद्यालय या शाळांना कृतीशील पुरस्‍कार प्रदान करण्यात आला.  महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने पुरस्‍कार देऊन सत्कार केला. राज्य शिक्षण आयुक्‍त विशाल सोलंकी यावेळी म्हणाले, राज्यातील सरकारी आणि खासगी अनुदानीत शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावला, तरच मराठी शाळांचे भविष्य चांगले राहील. शाळांतून जागतीक दर्जाचे विद्यार्थी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी अधिक कृतिशील झाले पाहिजे. 21 व्या शतकातील सर्व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अध्यापनात कृतीशीलतेवर भर देण्याची गरज आहे. यासाठी शिक्षकांची शालाबाह्य कामे कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी शासकीय पातळीवर नियोजन चालू आहे. शासन नियम व धोरणाच्या अधीन राहून मराठी शाळांना अधिकाधिक मदत करण्याचे धोरण आहे.पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, पुणे जिल्हा माध्य. उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड, राज्य कृती समितीचे सचिव अनंतराव गर्जे यावेळी उपस्थित होते.
आमदार सावंत म्हणाले की, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हिताचे शासन जे निर्णय घेईल, त्यासोबत शिक्षक कृतीशील समिती सदैव राहील. शिक्षक हिताच्या सरकारच्या सर्व संकल्पनांना आमचा पाठिंबा असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)