शहरातील लघु उद्योजकांची बैठक उद्या

 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना व पवना औद्योगिक वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगासमोरील समस्या व तोडगा यावर मंगळवारी (दि. 18) बैठक होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली. पिंपरीतील पवना औद्योगिक वसाहत सोसायटीच्या सभागृहात दुपारी दोन वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे नवनियुक्‍त अध्यक्ष संदीप जोशी मार्गदर्शन करणार आहेत.

पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेकडून दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक वसाहतींमधील लघु उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने नागरी सुविधांबरोबरच वाढत्या वीजदाराचा समावेश आहे. याबाबत अनेकदा संबंधित विभागप्रममुखांशी वेळोवेळी चर्चा करुन, निवेदन देऊनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. याशिवाय महापालिकेच्या गाळ्यांच्या भाड्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. जागतिक मंदीचा सामना करुनही, लघु उद्योजक या क्षेत्रात पाय रोवून उभे आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून प्रयत्न केले जात नाही. या सर्व घडामोडींच्या पाशर्वभूमीवर ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेलसरे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)