शहरातील रस्ते खरेच राष्ट्रीय मानांकनानुसार आहेत का?

पुणे – शहरातील रस्ते खरेच राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे आहेत का? 1987 च्या विकास आराखड्यात आखलेले रस्ते किती झाले, त्या रस्त्यांसाठीच्या जागा किती ताब्यात आल्या? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे ही आजच्या रस्त्यांच्या स्थितीवरून मिळतात. रस्तेआखणी पासून ते त्यासाठीचे भूसंपादन आणि प्रत्यक्षात रस्ते बांधणे या प्रक्रियेमध्ये “अर्बन स्ट्रीट डिझाईन गाइडलाइन्स’चे पालन केले जाते का, असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित होतो.

राष्ट्रीय नागरी परिवहन धोरण आणि सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसर शहरातील रस्त्यांचे योग्य ते नियोजन करण्यासाठी आणि रस्त्यांची रुंदीनुसार आराखड्यात एकसूत्रता आणण्यासाठी “अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स’ बनवले गेले आहेत. मात्र एकही रस्त्या या तत्त्वाप्रमाणे केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

अनेक रस्त्यांचे उदाहरण यामध्ये देता येईल. अमुक विरोध झाला म्हणून रस्त्याची रुंदी कमी केली. तमुक राजकारण्याचा आग्रह होता म्हणून रस्त्याची रुंदी कमी केली एक ना अनेक विषयांमुळे रस्त्याच्या आखणीत आजपर्यंत बदल करण्यात आले आहेत.

1987 च्या विकास आराखड्यातील 50 टक्‍क्‍यांहून जास्त रस्ते अद्यापही बांधले गेले नाहीत. एवढेच नव्हे तर रस्त्यांसाठीचे भूसंपादनही महापालिकेने केले नाहीत.

रस्त्यांच्या क्वालिटीबाबतही कायमच प्रश्‍न उपस्थित केला जातो. रस्त्यांची पुनर्बांधणी करताना म्हणजेच डांबरीकरण किंवा कॉंक्रीटीकरण करताना त्याचेही नियम ठरलेले आहेत. मात्र त्याचेही पालन महापालिकेकडून केले जात नाहीत. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीत दरवर्षी रस्त्यांवर डांबरीकरण करून रस्ते उंच आणि घरे खाली गेली आहेत. याचा परिणाम म्हणजे पावसाळ्यात घरांमध्ये पाणी साचते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

वास्तविक डांबरीकरण करताना रस्ता पूर्णपणे उखडून पुन्हा करणे आवश्‍यक आहे. परंतु महापालिकेतर्फे तसे केले जात नाही. आहे त्याच रस्त्यावर खडी आणि डांबर टाकून तो केला जातो. त्यामुळेच रस्त्याची उंची वाढते. पर्यायाने रस्त्याचे पोपडे निघून पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होतात. ही सगळी परिस्थिती केवळ रस्ते बांधण्यासाठी ठरवलेले नियम अंमलात न आणल्याने होतात. मात्र, त्याकडे महापालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)