शहरातील बसथांब्यांना अवकळा

बाकड्याची मोडतोड अन्‌ कचऱ्याचाही विळखा
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) –
सातारा शहरात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी बसथांबे उभारले खरे. परंतु, सध्या या बसथांब्याची अवस्था न बघविण्या इतपत दयनीय झाली आहे. प्रवाशांसाठी ठेवण्यात आलेल्या बाकड्यांची मोडतोड, तर थांब्यानजीकच साठत असलेला कचऱ्यामुळे हे थांबे आता प्रवाशांनाही अडचणीचेच ठरु लागले आहेत. दरम्यान, थांब्यांच्या उभारणीनंतर त्यांची देखभाल होणे अपेक्षित होते, परंतु, मुख्य बसस्थानकातीलच अडचणी महामंडळाला सुटत नसल्याने या थांब्यांच्या दरुस्ती, देखभालीचा विषयच उद्‌भवत नाही? असे म्हटले तर वावग ठरु नये.
सातारा शहरात पोवईनाका, जिल्हा परिषद, कमानी हौद यासह शहरातील इतरही ठिकाणी बसथांबे बांधण्यात आले होते. मात्र, सध्या या बसथांब्याची अवस्था अतियश दयनीय अशी झाली आहे. याठिकाणी उभे राहणाऱ्या प्रवाशांनाही ही थांबे आता अडचणीचेच वाटू लागले आहेत. उभारणीनंतर एकदाही या थांब्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांच्या बैठकीसाठी ठेवण्यात आलेल्या बाकड्यांचीही मोडतोड झाली आहे. सध्याच्या स्थितीत हे थांबे केवळ मद्यपी तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांची आश्रयस्थाने झाली आहे.
कचऱ्याचाही विळखा
प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या बसथांब्याची सध्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. याठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांकडून जवळील कचरा तिथेच टाकला जात असून त्याची योग्यवेळी स्वच्छताही होत नसल्याने याठिकाणी कचऱ्याचे ढिग साचत आहेत. कचऱ्यामुळे थांब्याच्या परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे.
दुरुस्तीची मागणी
मोडतोड झालेली बाकडी, थांब्यालगतच साचलेला कचरा अशीच काहीशी परिस्थिती शहरातील अनेक ठिकाणी बांधण्यात आलेल्या बसथांब्यांची झाली आहे. अवकळा प्राप्त झालेल्या या थांब्यामुळे शहराचेही नाक कापले जात असून या थांब्यांची तात्काळ संबंधित प्रशासनाने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांमधून केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)