शहरातील पार्किंग समस्येने सातारकर त्रस्त

बेशिस्त पार्किंग केल्यामुळे वारंवार होतेयं वाहतुकीची कोंडी

सातारा – सातारा शहरात पार्किंग समस्या गंभीर बनली असून नेमकं पार्किंग करायचे कुठे असा प्रश्‍न आता सातारकरांना पडला आहे. शहरात सुरु असलेल्या ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे. पोवई नाका परिसरासोबत आठ रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडला आहे. या ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याचे एकीकडे चित्र, तर दुसऱ्या बाजूला बेशिस्त पार्किंग केल्यामुळे वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी.

-Ads-

याबाबत वाहतूक शाखा हतबल ठरली असून. शहर परिसरातील पार्किंग समस्या सोडवा अशी केविलवाणी साद आज सातारकर नागरिक घालत आहेत. शहरातील, पोवई नाका हॉटेल महाराजा मागील बाजूस, तसेच राजवाडा चौपाटी, तांदूळ आळी, खण आळीचा रस्ता, मोती चौक ते पोवई नाक्‍यापर्यंत दोन्ही बाजूचा रस्ता, राजपथ, पंचायत समिती शेजारील रस्ता, एस्टी स्टॅंण्ड या ठिकाणी कायमच वाहतुकीची कोंडी होत आहे. या ठिकाणी दुचाकी लावली तर अन्य गाड्या लावयच्या कुठे हा प्रश्‍न पडला आहे.

एकीकडे वाहतूक शाखेकडे जबाबदारी शहरात वाहतुकीला शिस्त लावयची. पण त्यानी शिस्त लावली कुठे ? किंवा लावणार कशी हे आता तुम्हीच सांगा असा केविलवाणा प्रश्‍न त्यांनाच पडला आहे. मात्र नागरिकाच्या संतापाला त्यांना जावे लागत आहे हे खरे. नो पार्कींग चे बोर्ड हे फक्त दिखाऊ असले तरी त्याची अंमलबजावणी येत्या काळात करणे आवश्‍यक आहे.

ग्रेड सेप्रेटर जरी बनले तरी पार्किंगचा प्रश्‍न आहेच . त्यासाठी प्रामुख्याने उपाययोजना करणे आवश्‍यक असताना याकडे कोणाचे लक्ष नाही. या मध्ये चार चाकी वाहन चालकाची अवस्था तर सोडाच पण दुचाकी वाहन चालकाची देखील अवस्था बिकट झाली आहे. खरेदी करायला गेल्यावर मोकळी जागा पार्किंग साठी मिळणं म्हणजे नशीबाचा भाग असे काहींचे म्हणणे तर.

काही ठिकाणी जाळ्या टाकून आम्हला वाट द्या म्हणणाऱ्या व्यवसायिकांच्यात रोजच वादावादी होत आहे. शहरातील विविध भागात आज पार्किंग साठी कोणतीही व्यवस्था करण्याबाबत कोणीच आग्रही नसल्याचे नवल वाटते. एकीकडे वाढते शहरीकरण. त्यात वाहनांमध्ये होत चाललेली वाढ, मात्र त्याच्या साठी आवश्‍यक असलेली पार्कींगची कमी पडत असलेली जागा. वाढत असलेल्या टपऱ्या, बळकावलेले फुटपाथ त्यामधून वाढत असलेली वाहतुकीची कोंडी या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन हतबल ठरले आहे हे नक्की.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)