शहरातील पाण्यासाठी राजकारण नको

– सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस 15 वर्षे सत्तेत होती. मात्र, त्या काळात त्यांना आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणता आले नाही. तसेच, पवना बंद जलवाहिनी योजना पूर्ण करता आली नाही. अद्याप 10 लाख लोकसंख्येप्रमाणे 23 लाख लोकसंख्येच्या वाढत्या शहराला पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांत तांत्रिक कारणाने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्याच्यामुळेच शहराची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव व सांगलीच्या पराभव ते पचवू शकले नसल्याने त्यांच्या आजच्या कृतीवरून स्पष्ट होत आहे, अशी टीका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली.

-Ads-

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाणी टंचाईच्या कारणावरून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले आणि सत्ताधारी व प्रशासनावर आरोप केले. त्याला उत्तर देताना पवार बोलत होते.ते म्हणाले की, विरोधकांनी पाण्यावरून राजकारण करू नये. शहरासाठी अधिकचे पाणी घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहेत. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी साठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. पवना बंद जलवाहिनीतून पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांशी सनदशीर मार्गाने चर्चा सुरू आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)