शहरातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना

नगर – गणेशोत्सव काळात शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. बंद पथदिवे, नालेसफाई अभावी तुंबणाऱ्या गटारी या संदर्भात 2 दिवसात उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. जगताप यांनी महापालिका आयुक्‍तांना दिला आहे.

शहरात सध्या गणेशोत्सव सुरू आहे. याकाळात सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहे. त्यामुळे ऐन उत्सव काळात रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. नालेसफाईचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचत आहेत. अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसत आहे. ही सर्व कामे गणेशोत्सवापूर्वी होणे आवश्‍यक होते. परंतु महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील नागरिकांना सध्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजपर्यंतच्या गणेशोत्सवात यावर्षी सर्वात वाईट परिस्थिती शहरात असून, गणेश विसर्जन मार्ग बदलण्याची नामुष्की येऊ देऊ नका. येत्या दोन दिवसात उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आ. जगताप यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)