शहरातील चार केंद्रांवर नाट्य स्पर्धा

पिंपरी – पुणे विभागातील दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा उत्साहात पार पडल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड विभागातील देखील होत आहेत. पिंपरी-चिंचवड विभागातील 4 केंद्रांवर 5 ऑगस्ट रोजी प्राथमिक फेरी पार पडणार आहे. यामध्ये सुमारे 500 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. स्पर्धकांचा वाढता उत्साह पाहता यावेळी सिटी प्राईड, प्राधिकरण हे एक जास्तीचं केंद्र जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या केंद्राची प्राथमिक फेरी शनिवारी (दि. 4) पार पडणार आहे. उर्वरित 4 केंद्रांची प्राथमिक फेरी रविवारी (दि. 5) पार पडेल. यामध्ये अविष्कार बालभवन, मधुश्री कलाविष्कार, भारतीय जैन संघटना विद्यालय, संत तुकारामनगर, ब्लू रीड्‌ज पब्लिक स्कूल, हिंजवडी या केंद्रांचा समावेश आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी 6 वेगवेगळ्या गटात होणार आहे. यामध्ये शिशुगटापासून ते तरुण आणि ज्येष्ठांच्या गटाचा समावेश असणार आहे. अंतिम फेरी 12 ऑगस्ट रोजी निगडी प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनीच्या नवनगर विद्यालय येथे होणार आहे. तर बक्षीस समारंभ याच दिवशी सायंकाळी 5 या वेळेत याच शाळेतील मनोहर वाढोकर सभागृहात होणार आहे. नाट्य संस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा यापूर्वी फक्त पुणे विभागातून पार पडायच्या. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील केवळ अनेक केंद्र या स्पर्धेमध्ये सहभागी होत असत. मात्र पिंपरी-चिंचवडमधील स्पर्धकांच्या वाढत्या संख्येमुळे हा स्वतंत्र विभाग म्हणून चार वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आला, अशी माहिती नाट्य संस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)