शहरातील कवींनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मगावी राष्ट्रभक्‍ती जागवली

निगडी – हा स्वदेशी धर्म आमुचा, लागला ध्यास बाबू गेनूला, तिरंगा घेऊन आडवा गेला इंग्रजांच्या त्या हो गाडीला, कमवुनी नाव तो गेला, हुतात्मा बाबू गेनू झाला. ज्येष्ठ साहित्यिक व शब्दधन काव्य मंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांच्या या देशभक्‍तीने ओतप्रोत कवितेच्या ओळींनी राष्ट्रभक्‍ती जागवली. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कवींनी हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगावी महाळुगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे जाऊन शहीद बाबू गेनू यांच्या आठवणी कवितेतून जागवल्या. बाबू गेनू यांचे जन्मस्थळ, स्मारक व हुतात्मा बाबू गेनू विद्यालय, अशा तीन ठिकाणी कवी संमेलन झाले.
कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, जगातील कोणताही बदल आपोआप होत नाही. त्यासाठी उत्तम आणि विचारशील कृती करावी लागते, जी बाबू गेनू यांनी केली. यावेळी बाबू गेनू यांचे पुतणे पांडुरंग धनाजी सैद, किसन कुशाबा सैद, महाळुंगे पडवळचे सरपंच तुकाराम आवटे, ग्राम विकास अधिकारी मनोज भुजबळ, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ चासकर, शब्दधनचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कवयित्री राधाबाई वाघमारे यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब घस्ते यांनी “ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर केले. आईची महती अनिल दीक्षित यांनी कवितेतून सांगितली. कवी सुभाष चव्हाण, आय. के. शेख, तानाजी एकोंडे, मधुश्री ओव्हाळ, अंतरा देशपांडे, आत्माराम हारे, रघुनाथ पाटील, डॉ. पी. एस. आगरवाल, उमेश सणस यांनी कवितांमधून देशभक्‍ती जागवली. देशभक्‍तीच्या हुंकाराच्या कविता सादर केल्या. शोभा जोशी यांनी मुलांसमवेत “1942 चा क्रांतिदिन 9 ऑगस्ट’ ही रचना सादर करुन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्‍तीची ज्योत पेटवली. प्रकाश घोरपडे यांनी भैरवी म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केले. बाबू गेनू विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब खानदेशे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)