शहरातील अस्वच्छतेच्या विरोधात जनआंदोलन

भाजपच्या विरोधात आमदार संग्राम जगतापांनी थोपटले दंड

नगर – शहर व उपनगर परिसरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे. कचरा संकलन नियमित होत नसल्याने तसेच दैनंदिन साफसफाई होत नसल्याने स्वच्छेतचा पुरता बोजवारा उडाला आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तातडीने उपाययोजना न झाल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.

आ. जगताप यांनी महापालिकेता आंदोलनाचा इशारा देवून भाजपच्या विरोधात दंडच थोपटले आहे. महापालिकेत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपुष्ठात आले असतांना आ. जगताप यांनी या आंदोलनाच्या इशाऱ्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीची उभारणी सुरू केल्याचे दिसत आहे. अर्थात आ. जगताप यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याला मी जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. शहर विकासासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे आ. जगताप यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी 18 नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पार्श्‍वभूमिकवर आ. जगताप यांनी दिलेला इशारा हा भाजपची कोंडी करणार आहे. शहर स्वच्छेतेसाठी आ. जगताप यांनी निवेदन काढले असून ते निवेदन युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे यांनी आज अतिरिक्‍त आयुक्‍तांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शहरात दैनंदिन साफसफाई होत नाही. कचरा कुंड्यामधील कचरा उचलला जात नाही. शहरातील अनेक भागामध्ये कचऱ्याचे ढिग साठले आहे. तसेच कचरा जाळला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्या उपनगरात फिरणातांना दिसत नाही. त्यामुळे कचरा पडू राहत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी शहराच्या अस्वच्छेतेबाबत आवाज उठवून महापालिका जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. तातडीने महापालिका प्रशासनाने लक्ष देवून शहराची स्वच्छता करावी, अन्यथा राष्ट्रवादीतर्फे जनआंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)