सातारा शहरातील अतिक्रमणांवर आजपासून हातोडा

मोनार्क चौक,कासट मार्केट कॉर्नर,लोणार गल्ली कारवाईच्या रडारवर

सातारा – पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांनी नगरपालिकेचे कान उपटल्यावर शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अतिक्रमण हटाव पथक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होत आहे. सोमवारी संबधितांना केवळ तोंडी आदेश गेल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

सातारा शहराची अतिक्रमण मोहिम दरवेळी राजकीय दबावाला बळी पडली आहे .या दबावाचा सामना करताना शहर विकास विभागाचे कर्मचारी अक्षरश: घाईला येतं असत. शहर विकास आराखड्यांमध्ये तब्बल 84 मोकळ्या जागांची आरक्षणे होती . मात्र गेल्या दहा वर्षात मनोमिलनाच्या कारभारात अपवाद वगळता फारच कमी जागा विकसित झाल्या .स्थावर जिंदगी विभागाच्या ढिसाळ कारभाराने बऱ्याच जागा वैयक्तिक लाभासाठी दुसऱ्याच्या घशात घालण्यात आल्या. त्यातूनच सातारा शहराच्या विकासाला बाधक ठरणारी अतिक्रमणे फोफावत गेली. चौकट पालिका प्रशासनावर कारवाईचा दबाव. पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारा शहरातील वाहतुकीची कोंडी वाढली होती. त्यामुळे एकेरी वाहतुकीला स्थगिती देण्यात आली. आता रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हायची तर अतिक्रमणे हटवणे आता पालिकेला क्रमप्राप्त ठरले आहे. पालकमंत्री विजय शिवतारें यांनी कानपिचक्‍या दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी थेट सूचना केल्याने पालिकेवर अतिक्रमणे हटवण्याचा दबाव वाढला होता चौकट दोन आजपासून धडक मोहिम साताऱ्यात मंगळवार पासून धडक मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन जेसीबी दोन टिपर दिले जाणार असून पालिकेच्या बारा कर्मचाऱ्यांची दोन पथके सर्व तयारींनी सिध्द राहणार आहेत. राजवाडा समर्थ मंदिर चौक एस टी स्टॅंन्ड परिसर लोणार गल्ली मोनार्क चौक कासट मार्केट कॉर्नर इं ठिकाणी कारवाईचा दणका होणार आहे. या अतिक्रमणं हटाव मोहिमेला चोख पोलीस बंदोबस्त दिला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आकडे काय सांगतात ?
शहराचा परिघ – 8 मैल
संभावित अतिक्रमणे -32
परिसर- पोवई नाका कासट मार्केट कॉर्नर राजवाडा , लोणार गल्ली , समर्थ मंदिर चौक
कर्मचारी संख्या – 12 2 जेसीबी 2 टिपर 2 अतिक्रमण निरीक्षक .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)