शहराच्या स्वच्छतेबाबत नागरिकांना विचारले जाणार प्रश्‍न

सर्वेक्षण पथक सज्ज ः नागरिकांच्या उत्तरानंतरच ठरणार दर्जा

पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडचा देशात नववा आणि राज्यात पहिला क्रमांक आला. त्याचे मुल्यांकण करण्यासाठी केंद्र शासनाचे शहरी विकास मंत्रालय आणि भारत गुणवत्ता परिषदेच्या प्रतिनिधींनी स्वच्छतेबाबत आढावा घेण्यासाठी शहरात पाहणी दौरा करून सर्वेक्षण कामकाजासंबंधी कागदपत्रांची छाननी, आरोग्य विषयक बाबींची स्थळ पाहणी केली. आता सर्वेक्षण पथकाकडून शहरातील नागरिकांची मते जाणून घेऊन शहराच्या स्वच्छतेचे मुल्यांकन ठरविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मुल्यांकनाचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाने दिनांक 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवडचे स्वच्छ सर्वेक्षण केले. आता स्वच्छतेबाबत नागरिकांकडून माहिती मिळविली जाणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या पथकाने प्रश्‍नावली तयार केली आहे. या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी 1969 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यावयाचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण पथकाकडून आपल्याला कॉल येईल. प्रथम आपण ज्या भागात राहतो, त्या भागाचा पिनकोड क्रमांक विचारला जाईल. त्यावर नागरिकांनी आपण रहात असलेल्या भागाचा पिनकोड सांगावयाचा आहे.

पीनकोड सांगितल्यानंतर पथकाकडून स्वच्छतेसंदर्भात वेगवेगळे प्रश्‍न विचारले जातील. नागरिकांना स्वच्छतेचे साक्षिदार म्हणून सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यावरून स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना किती गांभीर्य आहे, याची माहिती पथकाला कळणार आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांनी सकारात्मक व समाधानकारक उत्तरे दिल्यानंतर त्यावरून शहराचा आणि महापालिकेचा स्वच्छतेचा क्रम ठरविला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना शहराच्या हितासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

अशी असणार प्रश्‍नावली
नागरिकांनी आपल्या ठिकाणचा पिन कोड टाकल्यानंतर स्वच्छतेबाबत 6 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. या प्रश्नावलीमध्ये नागरिकांना तुमचे शहर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सहभागी झाले आहे, याची माहिती तुम्हाला आहे का?, मागील वर्षापेक्षा यावर्षी तुम्हाला तुमचा परिसर स्वच्छ दिसतो का?, यावर्षी, बाजारपेठांमध्ये कचराकुंड्यांची संख्या वाढली आहे, असे तुम्हाला वाटते का?, महालिकेच्या प्रतिनिधींकडून तुमच्या घरामधून दारोदारी जाऊन कचरा संकलित केला जातो, याबाबत यावर्षी तुम्ही समाधानी आहात काय?, गतवर्षीच्या तुलनेने सार्वजनिक शौचालय व सामुदायिक शौचालयांच्या संख्येत वाढ झाली, असे तुम्हाला वाटत आहे का?, सार्वजनिक शौचालय किंवा सामुदायिक शौचालयांच्या साफसफाईमध्ये सुधारणा झाली आहे का?, असे प्रश्न विचारणात येतील.

शहरातील पिनकोड
शहरातील पिनकोड क्रमांक दापोडी- 411012, काळेवाडी- 411017, पिंपरी- 411018, चिंचवड पूर्व- 411019, भोसरी- 411026, चिंचवडगाव- 411033, आकुर्डी- 411035, भोसरीगाव- 411039, पिंपरी चिंचवड- 411044, पिंपळे गुरव-411061, तळवडे- 412114, चिखली- 411062 हे पीनकोड सांगयचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)