शहराच्या विकासात खोडा घालणाऱ्यांना जनता धडा शिकविल

नगर – शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून खा. दिलीप गांधी यांनी प्रयत्न करून 10 कोटी रुपयांचा निधी आणला. हा निधी शहरामध्ये विविध ठिकाणी विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे. मात्र, विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी खोडा घालण्याचे काम केले आहे. परंतु आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत. नगर शहराच्या विकासात खोडा घालणार्यांना जनता धडा शिकविल, असे प्रतिपादन उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केले.

कल्याण रोड विद्या कॉलनी येथे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या प्रयत्नातून बसविण्यात आलेल्या पथदिवे कामाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी छिंदम बोलत होते. याप्रसंगी गोरे, कांडेकर, बोराडे, झावरे, शिंदे, हराळ, शेख, रितेश आडेप, श्रीनिवास बोरके, भापकर, महांडुळे, सुरवसे, लाळगे आदी उपस्थित होते.
छिंदम पुढे म्हणाले की, शहराच्या विकासाचे कोणालाही देणे घेणे नाही. एकमेकांच्या विकासकामांत आडकाठी आणण्याचे काम जोमात सुरू आहे. शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम होणे गरजेचे आहे. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. कोणी कितीही विरोध केला, आडकाठी आणली तरी कोणीही विकासकामे थांबवू शकणार नाहीत. शहरात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याण रोड परिसर विकासकामांपासून वंचित आहे. या भागाच्या विकासासाठी मोठ्या निधीची गरज आहे. हा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयतक्‍शील आहोत, असे ते म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)