शहराच्या वाहतुकीची मदार मुदत संपलेल्या ब्रिटीश पुलावर

धोम’मधील पाणी सोडल्याने वाईतील लहानपुल पाण्याखाली
वाई,(प्रतिनिधी) – धोम धरणातून दहा हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा नदीला महापूर आला आहे. नदीपात्रात वाढलेल्या प्रचंड पाण्यामुळे वाई शहराची वाहतुकीची धुरा सांभाळणारे लहान पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतुकीचा ताण एकमेव असलेल्या ब्रिटीशकालीन मुदत संपलेल्या पुलावर आला आहे. शहरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील होत आहे.
पाण्यामुळे महागणपती पुलावरील वहातूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे किसनवीर चौकात वहातूकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ब्रिटीशकालीन पुलाची मुदत गेल्या वीस वर्षापूर्वी संपली असून तसा पत्रव्यवहार ब्रिटीश शासनाने वाई पालिकेला केला आहे. तरी ही वाई पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही. गणपती मंदिराकडे जाणारा नवीन पुल हा वहातुकीसाठी मुख्य पर्याय म्हणून पाहिले जातो. परंतु, धोम व बलकवडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने महागणपती पुलावरची वाहतूक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंद केली आहे. त्यामुळे वाई शहराचा व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना जुन्या ब्रिटीशकालीन पुलाशिवाय पर्याय नाही. राज्यातून महागणपतीला येणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठी आहे.
वाई शहरातून महाबळेश्वर, पाचगणी, धोम धरण या पर्यटन स्थळांना व शहरात महागणपती हे प्रसिद्ध देवस्थान असून मांढरदेव या देवस्थानाला शहरातून रस्ता जातो. संपूर्ण तालुक्‍यातील तसेच महाबळेश्वर पाचगणीतील लोक मोठ्या प्रमाणावर माल खरेदीसाठी वाई शहरात येत असल्याने साहजिक याचा वाई शहराच्या वाहतुकीवर ताण येत असतो. परिणामी किसनवीर चौक, शिवाजी चौक, शाहीर चौक, सर्वंच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)