शहराच्या मध्यवर्ती गौरीघुमट येथे अडीच लाखांची घरफोडी

नगर: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गौरीघुमटच्या तुळजाभवानी माता मंदिरालगत असलेल्या बुरावाड्यात 2 लाख 54 हजार रुपयांची घरफोडी झाली आहे. व्यंकटेश रामैय्या बुरा (वय 70) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. बुरा यांचे घर बंद होते. त्याचा फायदा घेत चोरांनी ही चोरी केली. चोरांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये प्रवेश करून तेथे उचकापाचक केली.

बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या तिजोरीचे दार चोरांनी उचकाटले. या तिजोरीतून चोरांनी दागिने चोरून नेले. त्याची किंमत अडीच लाख रुपये होती. बुरा हे घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. कोतवाली पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी घरफोडीच्या ठिकाणी पाहणी केली. श्‍वान आणून पोलिसांनी चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना हाती लागले नाही.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)