शहराच्या पर्यावरणाची चुकीच्या धोरणांमुळे दुर्दशा

पिंपरी – शहराच्या पर्यावरणाची दुर्दशा ही महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे होत असल्याचा आक्षेप घेत यात त्वरीत सुधारणा करण्याची मागणी पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) या सामाजिक संस्थेने केली आहे. संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी महापौरांना संबोधित करून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील विकास व पर्यावरण यामध्ये काहीतरी मोठी गडबड सुरू आहे. आपण शहरातील सर्व नद्या प्रदूषित करत आहोत. अनावश्‍यक बाबींवरच जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर सोयीस्कर रित्या पांघरुन घालून प्रलंबित ठेवण्यात येत आहे.

या पत्रामध्ये शहरातील विविध समस्यांचा संपूर्ण पाढाच वाचण्यात आला आहे. यात पहिला मुद्दा सार्वजनिक वाहतुकीचा घेण्यात आला असून पत्रात म्हटले आहे की, बीआरटी सेवेसारखा उपयुक्‍त उपक्रम 99 टक्‍के पूर्णत्वाला आला असताना त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बीआरटी सेवा तातडीने सुरू करावी व शहराच्या सार्वजनिक वाहुतकीची समस्या मार्गी लावावी. मेट्रोची पुढीच पाच वर्षात गरज नसताना लगेच निगडीपर्यंत नेण्याची गरज नव्हती. मेट्रोची गरज 2025 मध्ये भासणार आहे आणि तीही पुणे ते देहुरोड अशी असणे अपेक्षित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नदी प्रदूषणाचा मुद्दा मांडला असून शहरातील अनेक गटारे शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मैलापाणी सोडत असल्याचे म्हटले आहे. जलपर्णीसारखा गंभीर विषय केवळ बोलण्यापुरताच उरला आहे. सर्व प्रकारच्या प्रदुषणामुळे आणि शहराच्या बिघडलेल्या वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य एवढे ढासळले आहे की शहरात सर्वत्र डॉक्‍टर व औषधांच्या दुकानांची गर्दी झाली आहे. पाणी पुरवठ्यात राजकारण, भ्रष्टाचार व गुंडाराज सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वृक्षगणना विषयाला हास्यास्पद बनवून ठेवले असल्याचे व याबाबत काय प्रगती आहे, याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

या पत्रामध्ये अति महत्त्वाचे काही मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यात प्रशासन/लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा नागरिकांशी संपर्क तुटत चालला आहे. अंदाजपत्रकीय वार्षिक आर्थिक तरतुदी करताना गरता व आवश्‍यकता तपासणे गरजेचे आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन व संकलन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्याकडे तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या घरचा कचरा रोज नित्याने उचलला जावा, यासाठी घंटागाड्या त्वरित उपलब्ध करण्यासाठी पुढकार घ्यावा. आरोग्य विभाग हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या ताब्यात असणे गरजेचे आहे व आरोग्य कार्यकारी अधिकारी हा आरोग्य विषय निगडीत स्यानिटरी इंस्पेक्‍टर तोडीचा असणे गरजेचे आहे. या योग्यतेचे अधिकारी महापालिकेच्या सेवेत आहेत, त्यांना ही जबाबदारी सोपवावी असेही या पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)