शहराच्या जडण-घडणीत ज्येष्ठांचा मोलाचा वाटा

पिंपरी-“शहराच्या जडघडणीत जेष्ठांचा मोलाचा वाटा असून शहरातील जेष्ठांना आधार देण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करेल’, अशी ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निवृत्ती वेतनधारक दिनानिमित (पेन्शनर्स डे) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या मेळाव्याचे उदघाटन त्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी-चिंचवड सेवा निवृत्त सेवक परिषदेचे अध्यक्ष दिपक रांगणेकर, भगवान काणपूरकर, श्रीराम पोटे, सावळाराम साईल, पद्माकर जनपंडित, श्रीराम परबत, श्रीकांत मोने, कुमुदिनी घोडके, व्यंकटेश पांडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर राहुल जाधव म्हणाले, सेवानिवृत्त वेतनधारक करत असलेल्या मागण्या आमच्या व शहराच्या भल्यासाठीच आहेत. तुमच्या संस्कारातून घडल्यामुळेच शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. निवृत्त वेतनधारकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी महापालिका कटीबद्ध आहे. निवृत्त सेवकांसाठीच्या कार्यासाठी आवश्‍यक असलेल्या कार्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

यानंतर प्रा. श्‍याम भुर्के यांच्या विनोदी कार्यक्रमाने उपस्थितांना हास्यकल्लोळात नेले. विविध विनोदी किस्से त्यांनी सादर करून जुन्या स्मृतींना उजाळा दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)