शहराचा पाणीकोटा कमी होऊ देणार नाही

पालकमंत्री गिरीश बापट यांचे आश्वासन

पुणे – पुणे शहराचा पाणीपुरवठा कमी होऊ देणार नाही. तसेच, “महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणा’ने पाणी कपातीबाबत दिलेल्या निकालाविरोधात दाद मागण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा 20 टक्‍के पाऊस कमी झाल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत असून, सध्या उपलब्ध असलेल्या साठ्यातून जुलै अखेरीपर्यंत पुणेकरांना पाणीपुरवठा करायचा आहे. त्यात शहरातील पाणी वितरण व्यवस्था सदोष असल्याने ही समस्या अधिक तीव्रपणे जाणवत आहे. पाण्यावरून शहर आणि ग्रामीण असा वाद होऊ न देता सर्वांनाच पिण्यासाठी पाणी देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे बापट म्हणाले.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या निकालाविरोधात दाद मागण्याची तरतूद असून, त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांना त्याविरोधात दाद मागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राधिकरणाने पाण्याबाबत आदेश दिले असले तरी पुण्याची परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणचे फ्लोटिंग लोकसंख्या, 11 गावांतील लोकसंख्या, कॅनॉलमधील गळती या सर्वांचा विचार केला गेल्यास पुणेकरांना दरदिवशी किमान 1,350 “एमएलडी’ने पाणी पुरवठ्याची आवश्‍यकता आहे. त्यात आता कॅन्टोन्मेंटला करण्यात येणारा पाणीपुरवठा पाइपलाइनद्वारे सुरू झाल्याने पाण्याची गळती थांबली आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नसल्याचा पुनरूच्चार बापट यांनी केला.

ग्रामीण भागातही पाण्यावर निर्बंध
जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिक तसेच जनावरांना पाणी उपलब्ध करून द्यावे लागत आहेत. एकवेळ चारा विकत आणता येऊ शकतो, मात्र पाणी तर सोडावेच लागेल. कॅनॉलमधून पाणी सोडल्यानंतर त्यातून चोरी होणार नाही यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही तैनात करण्यात येतात. त्याशिवाय कॅनॉलच्या आजूबाजूचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येतो, जेणेकरून सहज पाणी उचलता येणार नाही. अनेक गावांचा पाणीपुरवठा कॅनॉलवर अवलंबून आहे. त्याशिवाय डावा कालव्यासह बेबी कॅनॉलची दुरुस्तीही तातडीने हाती घेतली आहे. “पीएमआरडीए’ने पाण्याचे नियोजन केले असून, गावांतील साठवण तलावांच्या दुरुस्तीसाठी 15 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, असे बापट यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)