शहराचा कायापालट करणार : शोभा माळी

वडूज : हायमास लॅम्पच्या उदघाटनप्रसंगी नगराध्यक्षा शोभा माळी, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, डॉ. महेश गुरव व इतर. (छाया : नितीन राऊत)

वडूज येथे हायमास लॅम्पचे उदघाटन

वडूज, दि. 14 (प्रतिनिधी) – गेल्या सहा महिन्यांपासून वडूजमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. आगामी काळात वडूजचा कायापालट करून स्मार्ट सिटी बनवणार, अशी ग्वाही नगराध्यक्षा शोभा माळी यांनी दिली.
नगरपंचायत फंडातून शहरात विविध प्रभागात हायमास लॅम्प बसवण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, किशोरी पाटील, मंगल काळे, सुनीता कुंभार, डॉ. महेश गुरव, अनिल माळी, प्रदीप खुडे, प्रदीप शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बाजार पटांगण, पेट्रोल पंप, लिंगायत स्मशानभूमी, गोडसे स्मशानभूमी, सार्वजनिक स्मशानभूमी, इंदिरानगर, तालुका कोर्ट, हुतात्मा विद्यालय या नऊ ठिकाणी उभे करण्यात आलेल्या हायमास लॅम्पचे उदघाटन करण्यात आले.
त्यापुढे म्हणाल्या, वडूजमध्ये सध्या एकीच्या बळावर विविध कामे खेचून आणण्यास यश आले आहे. ही विकासकामे सध्या शहरात युद्धपातळीवर सुरू आहेत. आमच्यावर नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठेवून वडूजचा कायापालट करून दाखविणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरसेवक शहाजीराजे गोडसे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर वडूज शहरात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर शहरात विकासाची गंगा वाहत आहे. येणाऱ्या कालावधीत वडूजच्या नागरिकांच्या सर्व मूलभूत सुविधा पूर्ण करून महाराष्ट्रातील’ आदर्श शहर’ म्हणून वडूजला बनविण्याचा आमचा मानस आहे. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)