शस्त्र बाळगणाऱ्या तरुणास अटक

पिंपरी – घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. मंगळवारी (दि. 4) रात्री साडेआठच्या सुमारास पडवळनगर, थेरगाव येथे ही कारवाई करण्यात आली.

मिलन संजय वोदक (वय-24, रा. पडवळनगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वोदक हा घातक शस्त्र बाळगून परिसरात दहशत करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला जेरबंद केली. दरम्यान, पोलिसांनी वोदक याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक लोखंडी कोयता मिळून आला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)