शस्त्रे नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न : तिघांवर गुन्हा दाखल

कराड – येथील शनिवार पेठेतील वडार नाका परिसरात दुचाकीवरून आरडाओरडा करत व हातात कोयता, चाकू नाचवत तिघांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी (दि. 29) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना पाहून शस्त्रे तिथेच टाकून तिघांनीही मोटरसायकलवरून पळ काढला. बाळू कुर्ले (रा. कराड), असे तिघांपैकी एका संशयिताचे नाव असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी शुक्रवारी छापे मारले. मात्र, ते सापडू शकले नाहीत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार पेठेतील वडार नाका परिसरात काही युवक मोटरसायकलवरून आरडाओरडा करत दहशत माजवत असल्याची माहिती सहाय्यक फौजदार संतोष सपाटे यांना मिळाली. त्यामुळे सपाटे हे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी दुचाकीवरून आरडाओरडा करत निघालेल्या तिघांना थांबवले. तिघांमध्ये बाळू कुर्ले (रा. कराड) व त्याचे दोन साथीदार होते. त्यांनी सहाय्यक फौजदार सपाटे यांना पाहताच कोयता, चाकू तेथेच टाकून दुचाकीवरून पोबारा केला.

सपाटे यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पसार झाले. घटनास्थळी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि स्वप्निल लोखंडे यांनी भेट दिली. पोलिसांनी शस्त्रे जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. दरम्यान, संशयीत कुर्ले व त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी सपोनि दीपिका जौंजाळ यांनी ठिकठिकाणी छापे टाकले. मात्र, संशयीत सापडू शकले नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)