शस्त्राचा धाक दाखवूनएटीएमचे 36 लाख लुटले

संगमनेर – एटीएमला पैसे पुरविणाऱ्या खाजगी कंत्राटदाराच्या दोन प्रतिनिधींना शस्त्राचा धाक दाखवून सुमारे 36 लाखांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना आज (दि.10) संगमनेर येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्‍यातील एटीएममध्ये रोकड पुरविणाऱ्या खाजगी कंत्राटदाराचे दोन प्रतिनिधी दुचाकीवरून दुपारी शहरातील दोन बॅंकांतील एकूण सुमारे 36 लाख रुपये घेऊन तालुक्‍यातील वडगाव लांडगा येथील एटीएममध्ये टाकण्यासाठी गेले होते.

यावेळी रस्त्यात समोरून येणाऱ्या एका मारुती व्हॅन गाडीने त्यांना वडगाव लांडगा शिवारातील कॅनॉलजवळ अडविले. गाडीतून अज्ञात चोरटे खाली उतरले आणि प्रतिनिधींना शस्त्राचा धाक दाखवत पैशांची बॅग ओरबाडली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी नाकाबंदी करत तपास सुरु केला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)