शस्त्रसंधी पालनाबाबत पाकिस्तानकडूून विश्‍वासघात – बीएसएफ

जम्मू – सीमेलगतच्या शस्त्रसंधीचा भारतीय सुरक्षा दलांकडून आदर केला जातो. दुर्दैवाने पाकिस्तानकडून तसे होत नाही. पाकिस्तानी रेंजर्सने नव्याने केलेला गोळीबार म्हणजे त्या देशाकडून झालेला विश्‍वासघातच आहे, अशी परखड भूमिका भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मांडली आहे.

आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत शस्त्रसंधी कराराचे पालन करण्याविषयी काही दिवसांपूर्वी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करांमध्ये सहमती झाली. मात्र, त्याचे पालन पाकिस्तानने केले नसल्याचे बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी के.एन.चौबे यांनी नमूद केले. सीमेच्या रक्षणासाठी भारतीय सुरक्षा दले सज्ज आहेत. त्या सज्जतेची आणि पाकिस्तानी माऱ्याला दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराची माहिती उघड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)